जगलेले आयुष्यच काव्यनिर्मितीस पोषक ठरते. - प्रा. प्रतिभा पैलवान
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात मराठी विभाग व प्रीतीसंगम हास्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध कवयित्री प्रा. प्रतिभा पैलवान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील उद्गार काढले. त्या पुढे म्हणाल्या की, कित्येकदा जगलेल्या आयुष्यातूनच नवनवे सुचत जाते. भावनाची उत्स्फूर्तता शब्द जुळवत जातात. आणि सुरेख अशी काव्यनिर्मिती होते. अनेकदा ही काव्यनिर्मिती इतरांना प्रेरक, मार्गदर्शक ठरत असते त्या त्या परिस्थितीतील गोड कुपी म्हणूनही लिखित काव्याकडे पाहता येईल. विद्यार्थ्यानी देखील या काव्यनिर्मितीचा आनंद लुटावा असे सांगून स्वरचित काही कविताचे त्यांनी सादरीकरण केले.तेव्हा उपस्थित सर्वजण मंत्रमुग्ध झाले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले की, कविता हा अतिशय अर्थगर्भ प्रवाह आहे. त्यातील शब्द सौंदर्य भावसौंदर्य,अथसौंदर्य टिपता आले पाहिजे. कविता म्हणजे भावनांचे सादरीकरण असते, तर आपल्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पाटील म्हणाल्या की, कवीसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव देणारा महत्वाचा उपक्रम असून त्याद्वारे नव्या मराठी भाषा आपोआपच संवर्धित होईल.
यावेळी हास्य परिवाराचे सदस्य मा. आनंद कलबुर्गी, प्रा सुरेश रजपूत, प्रा. सुरेश यादव, प्रा. अण्णा पाटील, प्रा. दयानंद कराळे, प्रा. अभिजित दळवी, प्रा. शोभा लोहार, प्रा. स्नेहल वरेकर, प्रा. स्वप्नाली काळे, प्रसाद भस्मे, सचिन कांबळे, कु श्रुती कांबळे यांनी कविता सादर केल्या.
No comments:
Post a Comment