वि. वा. शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या प्रती सदभावना व्यक्त करणे. मराठी भाषेवरील प्रेम वृद्धिंगत व्हावे आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे म्हणून २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषिकांनी मराठी भाषेवर मनापासून प्रेम करावे हीच या दिवशी मनोकामना बाळगून मराठीचा सन्मान करू असे प्रतिपादन प्रा. सुभाष कांबळे यानी केले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते तर उपस्थितामध्ये प्रा. डॉ. उज्ज्वला पाटील, प्रा. ए. जी. खोत, नवोदित साहित्यिक सूरज साठे आदी होते.
प्रा. सुभाष कांबळे पुढे म्हणाले की, भारतातील २२ भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमधे १५ वी तर भारतातील ३ री भाषा आहे. आताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा देखील येणे गरजेचे असल तरी मराठी भाषेचे महत्त्व देखील टिकवून ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
अध्यक्षीय मनोगत मांडताना प्राचार्य डॉ महेश गायकवाड म्हणाले की मराठी भाषेबद्दल आदराची भावना, प्रेम दाखवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो- महाराष्ट्रातील प्रत्येक जनमानसाला सदैव उपयोगाला येणारी भाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख केला जातो याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी नवोदित साहित्यिक सूरज साठे याचा मुक्ता साळवे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला- या समारंभास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment