Tuesday, January 4, 2022

भावनांना प्रकट करण्याचे सामर्थ्य कवितेत असते.- मा. आनंद कलबुर्गी

 

     शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथील भाषा विभागाच्यावतीने वाड्.मय मंडळाचे उद्घाटन कराड नगरीतील सुप्रसिद्ध व्यापारी व कवी मा. आनंद कलबुर्गी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्यांनी धावपळीच्या जगात मानवी भावनांना प्रकट करण्याचे सामर्थ्य कवितत असते, असे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सतीश घाटगे हात.

       कलबुर्गी पुढे म्हणाले की, कविता केली जात नाही ती होते. मनामध्ये जे आहे ते एकांतात लिहित जावं म्हणजे कविता फुलत जाते. विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही तर त्याबरोबरच बापूजी साळुंखे यांनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार याची दिलेली देणगी सर्वांनी आत्मसात केली पाहिजे. चुकातून सुधारणा होण गरजेच आहे. स्वतःचे लेखन असणं महत्त्वाचे आहे. भाषेत शब्दांचे सामर्थ्य असत. काव्यातून भावना व्यक्त करता येतात हे सर्व ज्ञान केवळ नोकरी चाकरीसाठी नसून चांगल जीवन जगण्यासाठी आहे.

            डॉ. सतीश घाटगे म्हणाले की, एखादी कविता ही एखाद्या पुस्तकाप्रमाणे तोलामोलाची असते. उषःकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' असे काव्य कानावरती पडते तेव्हा जी स्फूर्ती मिळते, जी शक्ती मिळते त्याची तुलना कुणाशीही केली जाऊ शकत नाही. सुंदर काव्य आपल्याला मानवतेकडे घेऊन जाते. साहित्याची कास एक वाचक म्हणून जोपासावी. रेषांची जुळवाजुळव केली की रांगोळी तयार होते. तसेच कलांचे आविष्कार मानवी जीवन घडवित असते.

           या कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला पाटील, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. रत्नाकर कोळी व हिंदी विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ सुतार यांनी केले हाेते यासाठी प्रा. मोहन पाटील, प्रा.सुरेश रजपूत, प्रा. दयानंद कराळे, प्रा. शितल सालवाडगी याचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. उज्ज्वला पाटील यानी केले, सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड तर आभार प्रा. रत्नाकर काेळी यानी मानले.









Monday, June 15, 2020

संतांची शिकवण काळाची गरज


           संतचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी।असे संत नामदेवांनी लिहिले व त्यातून संतांबद्दलचा आदर व्यक्त केला.संत म्हणजे साक्षात देव. संत म्हणजे पृथ्वीवर वावरणारी परमेश्र्वराची प्रतिमा.म्हणून 'जगाच्या किल्ल्याचा संतांच्या विभूती'असा त्यांचा गौरव केला जातो.ते त्यांच्या ठिकाणी असलेल्या दया,क्षमा, परोपकार, कणवाळूपणा या गुणांमुळेच. आपल्या सहवासात आलेल्या लोकांचे दु:ख दूर करणे हा संतांचा धर्म, कारण संत हे नि:स्वार्थी भावनेने समाजाची सेवा करीत असतात. 'हे विश्वची माझे घर','बुडती हे जन देखवेना डोळा'अशी त्यांची वृत्ती असते. दु:खितांचे दु:ख निवारण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.
       'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले','सर्व धर्म समभाव','प्राणीमात्रांवर दया', 'जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा', मानवीयता,  निसर्गाचे महत्त्व, अशा अनेक गोष्टींची शिकवण त्यांच्या आचरणातून मिळते. ज्याची आजच्या समाजाला अत्यंत गरज आहे. आपल्या कर्तृत्वामुळे व चारित्र्य संपन्नतेमुळे असे संत अमर झाले आहेत.
       आज जागतिकीकरणामुळे माणूस स्वत:मध्येच गुरफटत चालला आहे.'मी'पणाची भावना वाढवल्यामुळे अहंकार, लोभ, मोह वाढून'आम्ही'हे शब्द तो विसरत चालला आहे. सुखासीनतेमुळे पैसा, प्रतिष्ठा यांच्यातच तो घुटमळत आहे. साध्या साध्या गोष्टींनी गैरसमज वाढून कर्तव्यापासून विचलित झाल्यामुळे त्याच्यात स्वार्थीपणा वाढत आहे. म्हणून अशा समाजाला कर्तव्याची व मानवीयतेची जाणीव करून देण्यासाठी आज संतांच्या विचारांची व शिकवणीची गरज आहे असे मला वाटते.



Wednesday, December 16, 2015

पुस्तक प्रदर्शनास भेट

                   मराठी विभागातील प्राध्यापिका डॉ.कोमल कुंदप यांनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामी मठाच्या वतीने जुन्या कृष्णामाई सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनास भेट दिली.मठाच्यावतीने सदस्य स्वामींनी पुस्तक प्रदर्शनाचा हेतू विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विभागाचे वतीने काही पुस्तके खरेदी करण्यात आली.



Friday, December 11, 2015

ग.दि.माडगूळकर:जीवन व कार्य'


विभागाचे वतीने ग. दि. माडगूळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. दयानंद कराळे यांचे 'ग.दि.माडगूळकर:जीवन व कार्य'या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी माडगूळकरांच्या जीवनातील काही प्रसंगांना उजाळा दिला. आणि त्यांच्या साहित्य निर्मिती चि आढावा घेताना त्यांचे गीतरामायण थोडक्यात गाऊन दाखवले. तेव्हा विद्यार्थी व उपस्थित मान्यवर भारावून गेले. 
याप्रसंगी प्राचार्य डॉ जे. एस. पाटील, डॉ. जे. एल. म्हेत्रे, प्रा. यू. आर. माने व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.



Wednesday, November 4, 2015

वाड्. मय मंडळ उद्घाटन

       शिक्षण महर्षि बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने वाड्. मय मंडळ उद्घाटन व शब्दगंध भित्तिपत्रिकेचे अनावरण प्रमुख पाहुणे डॉ. महेश  गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे. एस. पाटील होते. यावेळी मार्गदर्शन करताना मा. प्रा डॉ महेश गायकवाड म्हणाले की, मराठी भाषा आणि साहित्य हे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात व जीवनात व्यापून राहिले आहे. मराठी साहित्य हे विविधतेने नटलेले आहे. त्यामुळे एक सृजनशील लेखक म्हणून मी सांगू इच्छितो की, आजच्या तरुण पिढीला आठवड्याला एक तरी पुस्तक वा ग्रंथ वाचणे आवश्यक आहे. पुस्तके आपले मित्र आहेत आणि ते आपल्याला खुणावत असतात. आपली बौद्धिक संपदा वाढवण्यासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी जास्तीत जास्त प्रमाणात वाचन केले पाहिजे. साहित्य हे काही आपल्या पासून वेगळे नाही. शब्द आणि त्याचे नेमके अर्थ कळाले की आपण आपोआपच त्याकडे आकर्षित होत जातो. म्हणून समजून घेऊन साहित्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा.





Thursday, October 15, 2015

वाचन प्रेरणा दिन

            शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मा. प्रा. डॉ. कन्हैया कुंदप यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात ते म्हणाले की, आजच्या काळात तरुण पिढी ही पुस्तकां पासून दूर होते आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध प्रकारचे वाचन विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. प्रकट वाचनाची सवय लागली तर बुद्धी सतेज राहते. सततच्या वाचनाने शब्दसंग्रह वाढतो. नवनवीन माहिती आत्मसात करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाची मैत्री करावी. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे जीवनाच्या अखेरच्या  क्षणापर्यंत वाचन करीत होते. एक खंदा वाचक, एक शास्त्रज्ञ, एक तत्ववेत्ता. जिज्ञासू अभ्यासक म्हणून डॉ.कलामांचे कार्य आजच्या काळात फार मोलाचे आहे. तरुणांनी कलामांच्या इच्छेप्रमाणे भारत महासत्ता होण्यासाठी कलामांच्या विचारांची कास धरावी.



सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

      शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. ०१/०४/२०२३ ते १३/०५/२०२३ य...