शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथील भाषा विभागाच्यावतीने वाड्.मय मंडळाचे उद्घाटन कराड नगरीतील सुप्रसिद्ध व्यापारी व कवी मा. आनंद कलबुर्गी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्यांनी धावपळीच्या जगात मानवी भावनांना प्रकट करण्याचे सामर्थ्य कवितत असते, असे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सतीश घाटगे हात.
कलबुर्गी पुढे म्हणाले की, कविता केली जात नाही ती होते. मनामध्ये जे आहे ते एकांतात लिहित जावं म्हणजे कविता फुलत जाते. विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही तर त्याबरोबरच बापूजी साळुंखे यांनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार याची दिलेली देणगी सर्वांनी आत्मसात केली पाहिजे. चुकातून सुधारणा होण गरजेच आहे. स्वतःचे लेखन असणं महत्त्वाचे आहे. भाषेत शब्दांचे सामर्थ्य असत. काव्यातून भावना व्यक्त करता येतात हे सर्व ज्ञान केवळ नोकरी चाकरीसाठी नसून चांगल जीवन जगण्यासाठी आहे.
डॉ. सतीश घाटगे म्हणाले की, एखादी कविता ही एखाद्या पुस्तकाप्रमाणे तोलामोलाची असते. उषःकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' असे काव्य कानावरती पडते तेव्हा जी स्फूर्ती मिळते, जी शक्ती मिळते त्याची तुलना कुणाशीही केली जाऊ शकत नाही. सुंदर काव्य आपल्याला मानवतेकडे घेऊन जाते. साहित्याची कास एक वाचक म्हणून जोपासावी. रेषांची जुळवाजुळव केली की रांगोळी तयार होते. तसेच कलांचे आविष्कार मानवी जीवन घडवित असते.
या कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला पाटील, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. रत्नाकर कोळी व हिंदी विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ सुतार यांनी केले हाेते यासाठी प्रा. मोहन पाटील, प्रा.सुरेश रजपूत, प्रा. दयानंद कराळे, प्रा. शितल सालवाडगी याचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. उज्ज्वला पाटील यानी केले, सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड तर आभार प्रा. रत्नाकर काेळी यानी मानले.
No comments:
Post a Comment